

वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ११२ कोटींची पाणीपट्टी वसुली करत विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून एका आर्थिक वर्षात झालेली ही सर्वाधिक वसुली ठरली आहे. यामुळे महापालिकेच्या महसूल वाढीस मोठा हातभार लागला आहे.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाने डिजिटल पद्धतींचा प्रभावी अवलंब केला. ऑनलाइन देयक, क्यूआर कोड, विविध डिजिटल माध्यमे यांचा वापर वाढविण्यात आला. तसेच एसएमएस, नोटीस, व्हॉट्सॲप संदेश आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मार्चमध्ये नागरिकांना पाणीपट्टी भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी साप्ताहिक, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची देयक संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. या सर्व उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होऊन यंदा वसुलीत लक्षणीय वाढ झाली. ही कामगिरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तसेच नियोजनबद्ध आणि काटेकोर वसुली मोहिमेमुळे शक्य झाल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.