

कर्करोग उच्चाटनाचा निर्धार
मिरा-भाईंदर पालिकेकडून आर्थिक तरतूद
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने निराधार, विधवा महिलांना विविध कारणांसाठी आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीत यंदा मोठी वाढ केली असल्याने निराधार महिलांच्या मुलांना कर्करोगासाठी निधीच्या तरतुदीत वाढ केली आहे.
निराधार, घटस्फोटीत अथवा विधवा महिलांच्या मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न तसेच मुलांना कर्करोगासारख्या दुर्धर रोगाने गाठले, तर महापालिकेकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद ठेवली जाते. या तरतुदीत भरघोस वाढ करण्यात आली आहे.
--------------------------------
वाढीव तरतूद
- निराधार महिला ५० लाखांवरून एक कोटी
- कर्करोग २५ लाखांची एक कोटी रुपये
- ‘माय माउली योजना’ ५० लाखांवरून एक कोटी
- ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेसाठी पाच लाखांऐवजी २० लाख
----------------------------
कर्करोगग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालिकेने केलेली तरतूद कमी पडत होती. याव्यतिरिक्त मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालयाचे कामही सुरू होणार आहे.
- ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.