उल्हासनगर स्थानकाबाहेर मुक आंदोलन

उल्हासनगर स्थानकाबाहेर मुक आंदोलन
Published on

उल्हासनगर स्थानकाबाहेर मूक आंदोलन
पुतळा स्थलांतरप्रकरणी प्रशासनाविरोधात संताप

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थलांतराच्या मागणीवरून उल्हासनगरमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ३) सकाळी उल्हासनगर रेल्वे स्थानक (पूर्व) परिसरात मूक आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर स्मशानभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा सन्मानजनक आणि योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, या मागणीसाठी ‘कायद्याने वागा लोकचळवळी’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे; मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सामाजिक कार्यकर्ते ॲड. कल्पेश माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मूक आंदोलनात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यामध्ये माजी नगरसेवक शांताराम निकम, मनोज कोरडे, प्रफुल केदारे, कैलास झाल्टे, प्रदीप कपूर तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता मोहोड, सिंधुताई रामटेके, प्रिती भोसले आदींचा समावेश होता.

प्रशासकीय हलगर्जीचा निषेध
आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असून, महापुरुषांच्या स्मारकाबाबत प्रशासनाने संवेदनशील राहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, आता महापालिका यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com