कडक उन्हात शिकंजीची वाढती मागणी

कडक उन्हात शिकंजीची वाढती मागणी
Published on

उन्हाळ्यात शिकंजीची मागणी वाढली

कासा, ता. ३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यासह परिसरात सध्या कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून, तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांवर पूर्वीसारख्या मोफत पाणपोई कमी प्रमाणात दिसत असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत थंडगार शिकंजी (लिंबू पाणी) हे पेय नागरिकांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे सध्या नाक्या नाक्यावरील रस्त्यांवरचे चित्र आहे.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने ठेवणारे पेय म्हणून शिकंजीकडे पाहिले जाते. लिंबातील जीवनसत्त्वे व मीठ-साखरेचे संतुलन शरीराला ऊर्जा देत असल्याने रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध असलेल्या शिकंजीला सध्या मोठी मागणी निर्माण झाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी, स्थलांतरित मजूर आणि कामगारांची वर्दळ असते. कडक उन्हात प्रवास करणाऱ्या या नागरिकांना महागडे पेय परवडत नसल्याने कमी किमतीत मिळणाऱ्या ऊसाच्या रस व शिकंजीकडे त्यांचा कल वाढला आहे.
चारोटी नाका येथे शिकंजी विक्री करणारे खाणिव गावचे रहिवासी राजू कोदे यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी येथे शिकंजी विक्री करीत आहे. उन्हाळ्यात तीन-चार महिने चांगला व्यवसाय होतो, तर पावसाळ्यात शेतीकडे वळतो. शिकंजीसाठी बर्फ, लिंबू, मीठ, साखर यासह पाण्याचा वापर करतो. दहा रुपये प्रति ग्लास दराने विक्री होते. तसेच चारोटी नाका हा महत्त्वाचा चाररस्ता असून, येथून डहाणू-जव्हार राज्यमार्ग तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. गुजरात, घोडबंदर, डहाणू आणि तलवाडा येथे जाणाऱ्या प्रवाशांची येथे नेहमीच गर्दी असते. रिक्षा व इतर प्रवासी वाहनांच्या थांब्यामुळेही येथे नागरिक मोठ्या संख्येने थांबतात. याचमुळे तहानलेल्या प्रवाशांना शिकंजी काही काळा ताजेतवाणे ठेवण्यास मदत करते असेही शिकंजी विक्रेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com