दगड खदानीमुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका

दगड खदानीमुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका
Published on

दगड खाणींमुळे नागरिक त्रस्त
घरांना पडणारे तडे; वायुप्रदूषणाबाबत तातडीने कारवाईची मागणी

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज संपत्ती उपलब्ध आहेत. तसेच इमारत व रस्ते बांधकामांसाठी लागणाऱ्या दगडांसाठी येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन होते. मात्र, याच दगड खाणींसाठी होणाऱ्या स्फोटांमुळे स्थानिक नागरिकांच्या घरांना तडे जात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. तसेच यामुळे वायुप्रदूषणही निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
जव्हारमधील हा दगड खाणींचे प्रश्न काही आताचा नाही. अनेक वर्षांपासून जव्हारमधील नागरिक त्याला सामोरं जात आहेत. खाणींमध्ये होणाऱ्या स्फोटांमुळे येथील घरांना तडे जाणे, धूळ व ध्वनिप्रदूषण, तसेच जमिनीला हादरे बसत असल्याने भूगर्भातील पाण्याचे स्रोत आटत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याचा पर्यावरणावरही गंभीर परिणाम दिसून येत आहे. यासंदर्भात प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मागील वर्षाच्या ग्रामसभेत नागरिकांनी बोअर ब्लास्टिंग (खाणींमध्ये होणारे स्फोट) बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अशाच एका स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यात चारही बाजूंना दगड फोडणाऱ्या मशीन असून, या मशीनला लागणाऱ्या दगडांच्या उत्खननासाठी तब्बल २० फूट खोल स्फोट घडवण्यात येतो. वेळी-अवेळी होणाऱ्या या स्फोटांमुळे स्थानिक नागरिक, वन्यप्राणी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. स्फोटांमुळे उडणारे दगड व धूळ यामुळे शेतीपिकांचेदेखील नुकसान होत असून, श्वसनाचे आजार वाढत असल्याचीही तक्रारी नागरिक करत आहेत.
-----------
नियम धुळीत
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्रशर मालक शासनाने घालून दिलेले नियम धुळीत घालत असून, स्फोटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जव्हार शहराजवळ तसेच ग्रामीण भागात गौण खनिज उत्खनन सुरू असून, येथे स्फोट घडवताना पुरेशा उपाययोजना राबवल्या जात नसल्याची माहिती पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
----------------
जव्हार तालुका परिसरात दगड खाणीत स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घराला तडे जाणे, बोअरवेलचेे पाणी आटणे, उडणाऱ्या धुळीमुळे शेतपिकांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या आरोग्यालाही हे बाधित ठरत आहे. यावर महसूल प्रशासनाने वेळीच अंकुश ठेवावा म्हणून मी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.
- एकनाथ दरोडा, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com