पोलादपूर तालुक्यात अवैध वाळू उपशावर संयुक्त बैठक; नियमांचे काटेकोर करण्याचा इशारा

पोलादपूर तालुक्यात अवैध वाळू उपशावर संयुक्त बैठक; नियमांचे काटेकोर  करण्याचा इशारा
Published on

अवैध वाळू उपशावर संयुक्त बैठक
पोलादपूर तालुक्यात नियमांचे काटेकोर करण्याचा इशारा
पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) ः पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नैसर्गिक हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसे संघटनेच्या पुढाकाराने तहसीलदार व वाळू व्यावसायिक यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासन, पोलिस विभाग, वाळू व्यवसायिक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस तहसीलदार कपिल घोरपडे, पोलिस सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे, संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष नीलेश कोळसकर, जिल्हा परिषद सदस्य नीलेश कुंभार, वैभव चांदे आणि मुंबई व ग्रामीण कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संस्थापक राज पार्टे यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार महसूल भरूनच वाळू उपसा करावा. तसेच आतापर्यंत अधिकृत परवानगी घेऊन वाळू काढणाऱ्यांची यादी सादर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच तालुक्यातील नद्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल (डोमेस्ट्री) तयार करून शासनाकडे सादर करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला काम देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यासाठी तलाठी व पोलिस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन व स्थानिक पातळीवर समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत
तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देत, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच, स्थानिक नागरिकांना घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार असून, ती स्वतःच्या खर्चाने काढण्यास परवानगी असेल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी पंचायत समितीकडून घरकुल यादी घेऊन योग्य ठिकाण निश्चित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com