

खरीप हंगामासाठी मशागतीला वेग
मोखाड्यात शेतीच्या राब भाजणीची लगबग
मोखाडा, ता. ३ (बातमीदार)ः मोखाडा तालुक्यात पेरणीपूर्व राब भाजणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. बळीराजा उन्हाच्या तडाख्यातही शेतीची पूर्वतयारी करण्यात गुंतला असून, वाढत्या उन्हामुळे राब भाजणीची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी राब भाजणीची कामे पूर्ण केली असून, अनेक ठिकाणी राब पेटवलेली आहेत. नजर जाईल तिथपर्यंत काळवंडलेली शेते, आकाशात उसळणारे धुराचे लोट ग्रामीण भागात दिसत आहेत. दुपारच्या कडक उन्हात तसेच सायंकाळच्या वेळेत कामे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी मॉन्सूनपूर्व शेतीकामात पूर्णतः व्यस्त झालेला आहे. बहुतांश शेतकरी मेच्या मध्यान्हात रोहिणी नक्षत्रात ‘धूळ वाफेवर’ नागलीची पेरणी करतात. या काळात पेरलेले बियाणे चांगले उगवते, अशी समजूत आजही शेतकऱ्यांमध्ये आहे.
-------------------------
ढगाळ वातावरणाचा अडसर
मोखाडा तालुक्यात खरिपाचे १२ हजार ६०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. तालुक्यात भात, नागली आणि वरई ही प्रमुख मुख्य नगदी पिके घेतली जातात. या पिकांसाठी रोपे तयार करण्याचा कालावधी मर्यादित असल्याने मेच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत तयारी पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, यंदा ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने खरिपाच्या राब भाजणीला अडथळा निर्माण होत आहे.
-------------------------
पर्यावरण रक्षणाचा संदेश
राब भाजणी करताना शेतकरी झाडांच्या निरुपयोगी फांद्या छाटून त्यांचा वापर करतात. यामध्ये गवत, शेणखत, सुका पालापाचोळा यांचा समावेश असतो. कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा घातक पदार्थ वापरल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. तसेच या प्रक्रियेमुळे जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.