रायगड जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना

रायगड जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना
Published on

रायगड जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना
तज्ज्ञांचा समावेश, जनजागृतीला चालना
रोहा, ता. ३ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि वाढत्या पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून,, नव्या समितीला व्यापक अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यावरण स्थिती अहवालांचा आढावा घेऊन समिती आवश्यक त्या शिफारशी करणार आहे. तसेच ऱ्हास झालेल्या नैसर्गिक संसाधनांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्संवर्धनासाठी शासनाला उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. वसुंधरा दिन, ओझोन संरक्षण दिन, वृक्षारोपण, प्लॅस्टिक निर्मूलन आदी उपक्रमांसाठी कृती आराखडे तयार करण्यावरही समिती भर देणार आहे.
नवीन विकास प्रकल्पांच्या पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालांवर समिती बारकाईने लक्ष ठेवणार असून, जनसुनावण्यांमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या घटकांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अलिबाग व रोहा विभागाचे उपवनसंरक्षक यांचा समावेश आहे. तसेच मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार व विधान परिषद सदस्य यांचा सहभाग राहणार आहे.
विशेष म्हणजे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून डॉ. सचिन पोरे व इंजिनिअर महेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, स्वदेश फाउंडेशन व राजेंद्र सामाजिक विकास संस्था या अशासकीय संस्थांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com