

आधी पुनर्विकासाचा आराखडा दाखवा, मगच करार
पीएमजीपी प्रकल्प; म्हाडासोबतच्या बैठकीत राहिवाशांची भूमिका, भाडेवाढसाठीही आग्रह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असून, त्याबाबत रहिवाशांसोबत कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, रहिवाशांनी सावध भूमिका घेतली असून, आधी पुनर्विकासाबाबतचा आराखडा दाखवा, मगच करार करू अशी भूमिका रहिवाशांनी म्हाडासोबत झालेल्या बैठकीत घेतली आहे. त्यामुळे म्हाडा आता पुढे कोणते पाऊल टाकणार याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
पीएमजीपी वसाहतीत चार मजली १७ इमारती असून, त्यामध्ये ९४२ निवासी व ४२ अनिवासी अशा एकूण ९८४ गाळे आहेत. सदर इमारती मोडकळीस आल्याने २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहतीचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने पीएएए करार करण्यासाठी नुकतीच रहिवाशांना करारपत्र दिली आहेत. रहिवाशांची बुधवारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत रहिवाशांची बैठक झाली.
आमचा पुनर्विकासाला विरोध नाही. मात्र, पुनर्विकास कसा असेल याबाबतचा आराखडा दाखवण्याची आग्रही मागणी केली. तेव्हा हा आराखडा एआयचा वापर करून चांगल्या पद्धतीने तयार केला जाणार असून, त्यासाठी संबंधित एजन्सीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडा रहिवाशांना दाखवू असे स्पष्ट केले. मात्र, रहिवाशांनी आधी आराखडा मग करार, अशी भूमिका घेतल्याने काहीसा तेढ निर्माण होणार आहे.
२५ हजार रुपये भाडे हवे
पुनर्विकासादरम्यान म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना मासिक २० हजार रुपये भाड्याचा पर्याय दिला आहे. मात्र, २५ हजार रुपये एवढे भाडे मिळायला हवे, अशी रहिवाशांची मागणी असल्याचे रहिवासी विकास कसबे यानी सांगितले. २० हजार रुपयात भाड्याने घर मिळणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.