

खदाणीत बुडून मुलाचा मृत्यू
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) ः खदाणीत पोहायला गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरात घडली. सुशील गुप्ता (वय १६) असे मृत मुलाचे नाव असून तो स्थानिक रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास सुशील मित्रांसह खदाणीत पोहण्यासाठी गेला होता; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली. पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सुशीलचा मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. सहा दिवसांपूर्वीच जीआयपी धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक धोकादायक पाण्याच्या ठिकाणी जात असल्याचे दिसत असून, अशा ठिकाणी पोहणे जीवघेणे ठरू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.