

‘निसान’च्या विक्रीत ९८ टक्क्यांची वाढ
गुरूग्राम, ता. ३ : निसान मोटर इंडिया प्रा. लिमिटेडने (एनएमआयपीएल) मार्च २०२६ मध्ये १०,३८८ गाड्यांची एकूण विक्री नोंदवत दमदार कामगिरी केली. देशांतर्गत होलसेल विक्री ४,४०८ गाड्या होती. ती मागील पाच वर्षांतील आतापर्यंतची सर्वाधिक मासिक देशांतर्गत होलसेल विक्री ठरली. दरम्यान, देशांतर्गत होलसेल विक्रीत फेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत ९८ टक्के वाढ नोंदवली असून, मार्च २०२६ मध्ये ५,९८० गाड्यांची निर्यात झाल्याचे कंपनीने सांगितले.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले की, ‘मार्चमधील देशांतर्गत विक्रीतील मोठी वाढ आमच्या उत्पादनांना ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद दर्शवते. न्यू निसान ग्रॅव्हाइटची ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी सुरू होत असताना आम्ही आमच्या ग्राहकांना निसान ब्रँडवरील प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. निसान मॅग्नाइटच्या सातत्यपूर्ण वेगासह आमच्या नेटवर्क भागीदारांचे काम पाहता तसे निसान फायनान्स आणि इतर बँकिंग भागीदारांच्या पाठिंब्यामुळे आम्ही भारतीय बाजारपेठेत दीर्घकालीन वाढ कायम राखण्यासाठी आमच्या नेटवर्कचा आणखी विस्तार करत आहोत.’ निसान मोटर इंडिया ६५ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशांतर्गत आणि निर्यात सेवा पुरवते आणि सध्या जागतिक स्तरावर दोन लाखांहून अधिक ग्राहक असून कंपनीने ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइटसह निसान मॅग्नाइटची विक्री केली आहे. कंपनीने २०२५ मध्ये एकूण १.२ दशलक्ष वाहननिर्यात साध्य केली. त्यामुळे ती भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल निर्यातदारांपैकी एक ठरली. व्यापक नेटवर्क, भारतकेंद्री उत्पादने आणि नावीन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ग्राहककेंद्री गतिशीलतेसाठी वचनबद्धतेच्या माध्यमातून निसान मोटर इंडिया आपली उपस्थिती बळकट करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.