

नवेनगर फाटा नामयज्ञ सप्ताह
कीर्तन महोत्सवाचे आयोजन
पोयनाड, ता. ३ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नवेनगर फाटा येथील भातगिरणीसमोरील मैदानात ११ ते १४ एप्रिलदरम्यान अखंड नामयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कीर्तन महोत्सव रंगणार असून नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे.
११ एप्रिल रोजी हभप उल्हास महाराज सूर्यवंशी, १२ एप्रिल रोजी हभप जगन्नाथ महाराज पाटील, १३ एप्रिल रोजी हभप पुंडलिक महाराज मोरे, तर १४ एप्रिल रोजी हभप अमित महाराज म्हात्रे यांचे कीर्तन होणार आहे.
सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिजागर, नगर प्रदक्षिणा व दीपोत्सव होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.