मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
Published on

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

मुंबई, ता. ३ : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर सात उपाध्यक्ष आणि १५ कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी नुकतेच जाहीर केले.
अध्यक्षपदासाठी १९९२पासून संस्थेची धुरा सांभाळत असलेले शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, डॉ. प्रदीप कर्णिक, माजी आमदार विद्या चव्हाण, पत्रकार व जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, गणराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेश पवार व विनायक परब यांचे अर्ज आले होते.      याशिवाय कार्यकारिणीच्या १५ जागांसाठी रवींद्र गावडे (विद्यमान प्रमुख कार्यवाह), जयवंत गोलतकर, प्रदीप ओगले, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, शिल्पा पितळे, हेमंत जोशी, अमेय कोंडविलकर, मकरंद केसरकर, महेश उपासनी, राजेंद्र कोरडे, सतीश राणे, दिनेश राणे, रमाकांत पाटील, विवेक भिडे या १५ जणांचे अर्ज आले होते. जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज आल्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
...
कार्यकारिणी अशी
कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यात उमा नाबर यांची कार्याध्यक्षपदी, मारुती नांदविस्कर कार्योपाध्यक्ष, रवींद्र गावडे प्रमुख कार्यवाह, जयवंत गोलतकर व सतीश राणे यांची कोषाध्यक्ष म्हणून, तर शिल्पा पितळे, अमेय कोंडविलकर व   प्रदीप ओगले यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय हेमंत जोशी, राजेंद्र कोरडे, दिनेश राणे, रमाकांत पाटील,  मकरंद केसरकर, महेश उपासनी, विवेक भिडे हे सात जण कार्यकारिणी सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com