

सत्य जनतेसमोर येणारच!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करून स्पष्ट संदेश दिला आहे, की सरकार पारदर्शकतेवर ठाम आहे. ‘सत्य काहीही असो, ते जनतेसमोर येणारच,’ असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत सांगितले, की हे प्रकरण कोणत्याही विरोधकांनी उघड केले नसून राज्य सरकारनेच पुढाकार घेत जनतेसमोर आणले आहे. फोन कॉलच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘सार्वजनिक जीवनात असताना शेकडो फोन येत असतात. प्रत्येक कॉलची नोंद ठेवणे शक्य नसते. फोन करणे किंवा घेणे हा गुन्हा नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत संयम राखण्याचे आवाहन केले.
दिल्लीतील कथित ‘डिनर डिप्लोमसी’च्या चर्चेलाही त्यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटणे, हा गुन्हा नाही. फोटोमध्ये एकत्र दिसल्याने राजकीय समीकरणे बदलतात, असे मानणे चुकीचे आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. याचबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राष्ट्रीय पातळीवर अधिक मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला. खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, की तरुण नेतृत्व देशाची भूमिका जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
धाराशिव जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागा आणि आंब्याच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.