तांत्रिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तांत्रिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

तांत्रिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसई, ता. ३ : विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी बुधवारी (ता. १) ‘ओसिलेशन २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा आणि गुरुवारी (ता. २) ‘व्हीएनपीएस २०२६’ ही राष्ट्रीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा उत्साहात झाली.

या दोनदिवसीय आंतर-महाविद्यालयीन महोत्सवात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पनांवर आधारित आपले तांत्रिक शोधनिबंध व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संयुक्त राष्ट्र बाह्य अवकाश व्यवहार कार्यालयाचे डॉ. शिरीष रावण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधनाबाबत माहिती देऊन तांत्रिक क्षेत्रात निरंतर प्रगती करण्यासाठी विशेष प्रेरित केले. या महोत्सवासाठी आयईईई, आयएसए, सीएसआय, एनएसडीसी, आयएसएचआरएई, आयटीई, व्हीएमईए, सीईएसए आणि आयजीबीसी यांसारख्या नामांकित तांत्रिक संघटनांचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते आणि शैक्षणिक अधिष्ठाता विकास गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत तांत्रिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली असून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक, खजिनदार हसमुखभाई शाह आणि सहसंचालक विशाल सावे यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com