

श्रीवर्धन पंचायत समिती सभापतिपदी सचिन कीर बिनविरोध
श्रीवर्धन, ता. ३ (बातमीदार) : श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन कीर यांची गुरुवारी (ता. २) निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तालुक्यात विविध स्तरातून त्यांच्या नेतृत्वाबद्दल अपेक्षा व्यक्त होत आहेत.
श्रीवर्धन येथील पंचायत समिती सभापतिपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले होते, परंतु तालुक्यात अनुसूचित जमातीचा सदस्य निवडून न आल्याने सभापतिपद रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार आरक्षण जाहीर झाल्याने एकमताने सचिन कीर यांची सभापतिपदी निवड झाली. किर हे पंचायत समितीकरिता दिघी गणातून २३९४ मतांची आघाडी घेत विजयी झाले होते. निवड जाहीर होताच पंचायत समिती कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
रायगड जिल्हा उपाध्यक्ष महम्मद मेमन, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष मंदार तोडनकर, उद्योगपती संदेश कीर, माजी सरपंच रमेश घरत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भावेश मांजरेकर, दीपक दरगे, अजिंक्य सुर्वे, दिनेश शिरवटकर, प्रेमनाथ मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी कीर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सचिन कीर यांनी सर्व सदस्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असून, सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.