

घरफोड्यांप्रकरणी एकाला अटक
डोंबिवली, ता. ३ ः अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली परिसरात बंद घरे, दुकाने व हॉटेल्स फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी चक्कीनाका परिसरात सापळा रचून अटक केली. या कारवाईत आरोपीकडून मोबाईल फोन, स्कूटर व रोख रक्कम असा एकूण दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. अनिल संजू रूपवते (वय २०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार संजू किसन वाघरी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कल्याण-शिळ महामार्गावरील नेतिवली येथील सूचक नाक्यावर मोमीन उमर शेख (५९) यांचे हॉटेल आहे. २१ ते २२ मार्चच्या दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.