घाटकोपरमधील ५० वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार

घाटकोपरमधील ५० वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार
Published on

घाटकोपरमधील ५० वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार
८०० मीटरची नवीन जलवाहिनी टाकणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : घाटकोपर पूर्वेकडील परिसरात नवीन नऊ इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यामुळे या भागातील गेल्या ५० वर्षांतील पाणीप्रश्न सुटणार आहे. ८०० मीटर लांबीच्या जलवाहिनीच्या कामाचा आरंभ आमदार पराग शहा यांच्या हस्ते झाला.
नवीन जलवाहिनीचे जाळे विस्तारले जाणार असल्याने घाटकोपर पूर्वेकडील परिसरातील ५० वर्षांपासूनची समस्या दूर होणार असल्याचे प्रभाग क्रमांक १३१च्या नगरसेविका राखी जाधव यांनी सांगितले. त्यांच्या पुढाकाराने जलवाहनीचे काम होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. घाटकोपर (पूर्व) येथील लक्ष्मीनगर आणि लक्ष्मीबाई बाग परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. बॉम्बे २ (बी २) या मुख्य जलवाहिनीमधून ८०० मीटर लांबीची नवीन नऊ इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com