

महिलेची १६.३५ लाखांची फसवणूक
ठाणे, ता. ४ : इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली कापूरबावडी परिसरातील एका गृहिणीची १६.३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोखरण रोड नंबर २ येथे राहणाऱ्या नॅन्सी ॲन्सीएल फर्नांडिस (४६) या गृहिणीने याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत जून २०२५मध्ये एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. त्यानुसार तक्रारदार आणि त्यांची मुलगी संबंधित कार्यालयात गेल्या. तेथे सैफ खान, तशीन खान आणि श्रुती नावाच्या महिलेने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी डोनेशन व फीच्या नावाखाली वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात असे एकूण १६.३५ लाख रुपये घेतले. तसेच बनावट पावत्या व आयकार्डसाठी फॉर्म देऊन विश्वास संपादन केला. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये चौकशी केल्यानंतर मात्र संबंधित पावत्या व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. कापूरबावडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.