

सौर कृषीसाठी ग्रामपंचायतींना निधी
मुंबई, ता. ४ : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा वीजपुरवठा करता यावा, म्हणून मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनीअंतर्गत विकेंद्रित वीजवाहिनीवर आधारित सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ५१२ ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी दिली जाणार आहे. त्याकरिता सरकारकडून महावितरणला २५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. राज्यातील कृषी फिडर्सचे सौरऊर्जीकरण मिशन मोडवर केले जात आहे. त्यानुसार एकूण १६,००० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक विकास आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागणार असल्याने अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन दिले जावे, म्हणून ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाच लाख रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याबाबतचा निधी राज्य सरकारने महावितरणकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीस प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.