

श्रीवर्धन आगारातील नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचे हाल
बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष
श्रीवर्धन ता. ५ (वार्ताहर) : श्रीवर्धन आगाराकडून मुंबई विभागात पाठवण्यात येणाऱ्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या बस वारंवार भररस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आगारात बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे.
पहाटे ४ वाजता सुटणारी श्रीवर्धन-डोंगरी मुंबई बस नागोठणेजवळ इंजिन ऑइल पंप निकामी झाल्याने अचानक बंद पडली. इंजिन ऑइलची पातळी कमी असणे, निकृष्ट दर्जाचे ऑइल किंवा नियमित देखभालीचा अभाव यामुळे अशी बिघाड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डॅशबोर्डवरील तेलदाब दर्शविणारे निर्देशक बंद अवस्थेत असल्याने चालकाला वेळीच याची माहिती मिळाली नाही.
आगारातील अनेक बसची अवस्था अत्यंत खराब असून, आसनांची मोडतोड, खिडक्यांच्या सैल काचा, तसेच रात्रीच्या बसमध्ये अपुरे दिवे अशी परिस्थिती आहे. याशिवाय मुंबईकडे जाणाऱ्या बसेस संथ गतीने धावत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्ग संतप्त झाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया. :-
श्रीवर्धन आगाराचा ढिसाळ कारभार आहे. मुंबई शहराकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या मार्गावर नादुरुस्त बसेस पाठवल्या जातात. आगाराकडे नवीन बसेस आहेत, पण त्या लातूर व बीड मार्गावर पाठवण्यात येतात. आज डोंगरी मुंबई या नादुरुस्त बसचा भुर्दंड आम्हाला बसला.
- पंकज गुरव, प्रवासी, श्रीवर्धन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.