डम्पिंग ग्राउंडवर सोलर पार्क उभारा!

डम्पिंग ग्राउंडवर सोलर पार्क उभारा!
Published on

डम्पिंग ग्राउंडवर सोलर पार्क उभारा!
मुंबई, ता. ४ : ईशान्य मुंबईत देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड ही तीन डम्पिंग ग्राउंड असून याठिकाणी सोलर पार्क उभारल्यास येथील प्रदूषणाची समस्या दूर होईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डम्पिंग ग्राउंडवर सोलर पार्क उभारल्यास दुहेरी फायदा होईल, यामध्ये प्रदूषण कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीही वाढेल, यासाठी केंद्र सरकारकडे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी मागणी केली आहे. मुंबईसारख्या सर्वाधिक वीज वापर करणाऱ्या महानगरात केवळ २५ हजारांहून कमी सोलर रूफटॉप बसवण्यात आले असल्याची बाब खासदार पाटील यांनी अधोरेखित केली आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घरावर सोलर रूफटॉप बसवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस योजना, प्रोत्साहन आणि कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com