

स्पाच्या नावाखाली कुंटणखाना
कळंबोलीतील कारवाईत दोघे अटकेत
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : ‘बॉडी मसाज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या कळंबोलीतील एका स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून पती-पत्नीला अटक केली आहे. तसेच एका पीडित महिलेची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोली सेक्टर १६ मधील ‘गोल्डन किंग सलून आणि स्पा’ येथे मसाज पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोल्डन किंग सलून आणि स्पा’मध्ये शुक्रवारी (ता. ३) बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून स्वीकारलेल्या ५०० रुपयांच्या नोटा, तीन महागडे मोबाईल फोन आदी जप्त केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समीर ऊर्फ अलीगोर अब्दुलहफिज अन्सारी (३३) व त्याची पत्नी परी ऊर्फ सलमा अलीगोर अन्सारी (२६) हे पीडित महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने समीर ऊर्फ अलीगोर अन्सारी व परी ऊर्फ सलमा अन्सारी यांच्याविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.