

मोदींनी भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढवली : सिंह
मुंबई, ता. ४ ः ‘भारताची जागतिक प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वाढत आहे,’ असे प्रतिपादन युवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केले. २०१४ नंतर जगभरात भारताची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचेही ते म्हणाले. २०४७ पूर्वी भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सिंह यांनी अलीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा उल्लेख करत सांगितले, की ‘या कराराचा लाभ देशातील सर्व घटकांना होणार आहे.’ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले, की ‘राहुल गांधी हे सतत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र जनता त्यांच्या प्रभावाखाली येणार नाही. देशातील जनता गेल्या ५० वर्षांहून अधिक काळाच्या शासनाचा हिशेब मागत आहे.’ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करत सांगितले, की ‘नेहरू-गांधी कुटुंबाव्यतिरिक्त पक्षात इतर नेत्यांना स्थान नाही. त्यांनी समाजवादी चळवळीतील नेते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांचा संदर्भ देत सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. सिंह यांनी सांगितले, की त्यांची संघटना गाव, गरीब, शेतकरी, कामगार, मागासवर्गीय, वंचित आणि दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.