स्कूलबस चालकांना सुरक्षिततेची थेरपी

स्कूलबस चालकांना सुरक्षिततेची थेरपी
Published on

विद्यार्थी सुरक्षा हीच प्राथमिकता
आरटीओकडून स्कूल बसचालकांना ‘सुरक्षिततेची थेरपी’

ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : रस्ते अपघातातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून, त्यांची सुरक्षा ही केवळ चालकाची नाही तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बसचालकांसाठी विशेष जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सतर्कता आणि संयम बाळगणारा चालकच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खरी हमी देऊ शकतो, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी या वेळी केले.

परिवर्तन सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आणि ठाणे आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमध्ये हा उपक्रम पार पडला. यामध्ये ठाणे शहरातील विविध शाळांमधील सुमारे २०० बसचालक, महिला अटेंडंट आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले होते.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी चालकांशी संवाद साधला. कामाचे तास, वाहतूक कोंडी आणि कौटुंबिक ताण यामुळे चालकांच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. व्यसनाधीनता टाळून शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आपत्कालीन प्रशिक्षण
डॉ. दीपाली कर्णिक यांनी सीपीआरचे प्रात्यक्षिक दाखवले. अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मुलांचा जीव कसा वाचवावा, याचे तांत्रिक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले. शिबिरात चालकांची नेत्र तपासणी, रक्त चाचणी आणि दंत तपासणी करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक अमोल राठोड यांनी ब्लाइंड स्पॉट्स, वेग मर्यादा आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या तांत्रिक बारकाव्यांवर मार्गदर्शन केले.

विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना हेल्मेट आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. सुरक्षित प्रवासाच्या नियमांची उजळणी करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com