

उल्हासनगरात सराईत चोरट्याला बेड्या
१० गुन्ह्यांचा पर्दाफाश, मध्यवर्ती पोलिसांची कामगिरी
उल्हासनगर, ता. ५ (बातमीदार) : वाहनातील बिघाडाचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मध्यवर्ती पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या अटकेमुळे उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी परिसरातील चोरी, मोटारसायकल चोरी आणि घरफोडीच्या तब्बल १० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मध्यवर्ती पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून तीन दुचाकी, तीन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील तीन, विठ्ठलवाडीतील एक आणि परिमंडळ ३ मधील सहा घरफोड्या अशा एकूण १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.
बदलापूर येथील रहिवासी जयराम ओटे हे दोन दिवसांपूर्वी आपल्या कारने कल्याण-अंबरनाथ रोडवरून जात असताना, उल्हासनगर ''सेक्शन १७'' जवळ त्यांच्या गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. गाडी थांबवून ते पाहणी करत असतानाच, एका चोरट्याने संधी साधून बोनेटवर ठेवलेला मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे (आधार, पॅन कार्ड) आणि रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी विशेष तपास पथक तयार केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने केवळ ओटे यांचीच नव्हे, तर इतर अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.