सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांकडून रहिवाशाला मारहाण

सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांकडून रहिवाशाला मारहाण
Published on

अंबरनाथमध्ये सोसायटीच्या ग्रुपवरील मेसेजवरून राडा
पदाधिकाऱ्यांकडून रहिवाशाला बेदम मारहाण
​अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज पाठवल्याच्या कारणावरून अंबरनाथमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सोसायटीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण करत त्यांचे डोके फोडले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव परिसरातील ‘पार्श्वहिल सोसायटी’मध्ये राहणारे प्रमोद प्रेमनाथ विश्वकर्मा (४२) यांनी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. ‘माझ्या घरी कोणत्याही अनोळखी इसमाला परस्पर पाठवू नये, अशा सूचना वॉचमनला द्याव्यात,’ अशी विनंती त्यांनी या मेसेजद्वारे पदाधिकाऱ्यांना केली होती.

१ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास या मेसेजचा राग मनात धरून सोसायटीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी विश्वकर्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरोपींनी विश्वकर्मा यांना घेराव घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रागाच्या भरात विशाल भालिदे याने खुर्ची उचलून विश्वकर्मा यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये त्यांचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले.

जखमी विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विशाल भालिदे, आनंद देविदास बामणीकर, हर्ष देविदास बामणीकर, दिनेश डुगुर्टे, बाबूराव डुगुर्टे या पाच जणांविरुद्ध गुन्हासंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. टी. अमृतकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com