

ठाण्यात वेश्याव्यवसायप्रकरणी महिलेला अटक
ठाणे, ता. ५ ः घोडबंदर रोडवरील एका नामांकित फॅमिली रेस्टॉरंट आणि बारमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केलेल्या या कारवाईत एका महिला दलालाला अटक केली असून, दोन गरजू महिलांची या विळख्यातून सुटका करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे यांना घोडबंदर रोडवरील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘वाइन एन डाइन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार’ येथे देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास पोलिसांनी तिथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. या कारवाईदरम्यान मालाड येथील मंदाकिनी ऊर्फ आरोही रेहमान बेदीया (वय २७) या महिला दलालाला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. तपासात असे समोर आले, की आरोपी महिला गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत होती. ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून ती महिलांचा पुरवठा करत असे.
दोन महिलांची सुटका
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन महिलांची सुटका केली असून, त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपी मंदाकिनी बेदीया हिच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.