सिलिंडर टंचाईतच चोरट्यांचा धाडसी डाव

सिलिंडर टंचाईतच चोरट्यांचा धाडसी डाव
Published on

सिलिंडर टंचाईत चोरीचा ‘भडका’
भररस्त्यात गॅस वितरणाच्या गाडीतूनच सिलिंडर लंपास
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिक आधीच हैराण असताना आता चोरट्यांनी थेट सिलिंडर वितरणाच्या गाडीवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढत्या दरांचा फायदा घेत दिवसाढवळ्या करण्यात आलेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमधील भैय्यासाहेब आंबेडकर सोसायटी परिसरात ही घटना घडली. परिसरात सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी ओढाताण सुरू आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी गॅस वितरणासाठी आलेल्या गाडीवर पाळत ठेवली. वितरक ग्राहकांना सिलिंडर देण्यासाठी गाडीपासून काही अंतरावर जाताच, चोरट्यांनी अत्यंत वेगाने गाडीतून सिलिंडर खाली उतरवले आणि पळ काढला. ही संपूर्ण चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.

नागरिकांमध्ये भीती आणि संताप
सिलिंडरचे वाढते दर आणि त्यातच सुरू झालेली ही नवी चोरीची पद्धत यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आधीच सिलिंडर मिळत नाही, त्यात आता अशा चोऱ्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फायदा घेत चोरटे आता थेट वितरणाच्या गाड्यांना लक्ष्य करत आहेत. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com