

ठाण्यात ‘पिकल बॉल’चा झंझावात
भव्य कोर्टचे उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी क्रीडा व्यासपीठ खुले
ठाणे, ता. ५ : शहरात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘पिकल बॉल’ या खेळाला आता ठाणे पूर्व भागात हक्काचे मैदान मिळाले आहे. ठाणे पूर्व येथे नूतन पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सुविधेमुळे स्थानिक खेळाडू आणि तरुणाईसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हा प्रकल्प ‘पीपल एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘द्रोणाचार्य क्रीडा अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आला आहे. ठाण्यात यापूर्वी काही खासगी कोर्ट असले, तरी सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होईल, असे हे पहिलेच महत्त्वाचे शासकीय स्तरावरील पाठबळ लाभलेले कोर्ट मानले जात आहे.
उद्घाटनप्रसंगी पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, सचिव आल्हाद जोशी, ठाणे पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर डुंबरे, सचिव सचिन मोरे, अॅड. सुभाष काळे यांच्यासह मेधा भंडारी, संचालक भोळे आणि तुरुकमाने उपस्थित होते.
आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी म्हटले की, पिकल बॉलसारख्या आधुनिक खेळाकडे तरुणांचा कल वाढत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी हे कोर्ट मैलाचा दगड ठरेल. खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सर्वसामान्यांसाठी उपलब्धता
खासगी क्लबच्या तुलनेत हे कोर्ट सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होणार आहे. ठाणे पूर्व भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली येथे भविष्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. या नवीन क्रीडा सुविधेमुळे ठाणे पूर्व परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळणार असून, भविष्यात या कोर्टमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.