चार लाखांचा सायबर घोटाळा

चार लाखांचा सायबर घोटाळा
Published on

वीजबिलाच्या बनावट मेसेजद्वारे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
ठाणे, ता. ५ : वीजबिल थकल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर गुन्हेगारांनी ठाण्यातील एका ८९ वर्षीय नागरिकाला तब्बल तीन लाख ९७ हजार ५६१ रुपयांना गंडा घातला आहे. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कापले जाईल, अशी भीती दाखवून ही फसवणूक केली असून, कासारवडवली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारे हिमांशू चंद्रशेन नाडकर (८९) यांना १८ फेब्रुवारीला एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला. तुमचे वीजबिल न भरल्यामुळे आज रात्री कनेक्शन तोडले जाईल, असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. नाडकर यांनी मेसेजमधील क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने स्वतःचे नाव संतोष शर्मा असल्याचे सांगितले. त्याने केवळ १२ रुपये सेवा शुल्क भरून बिल अपडेट करण्यास सांगितले. शुल्क भरण्याच्या प्रक्रियेत नाडकर यांच्या बँक खात्यातून अनधिकृतपणे व्यवहार सुरू झाले. सुरुवातीला ६१ हजार रुपये कापले गेल्याचे बँक मॅनेजरकडून समजले. त्यानंतर २५ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत डीटीके अपलोड टोकन या नावाने वारंवार व्यवहार होऊन एकूण तीन लाख ९७ हजार ५६१ रुपये लंपास करण्यात आले.
आणि तक्रार फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाडकर यांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com