

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तिपत्रांचे वितरण
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पालघर जिल्ह्यात संघटनात्मक मजबुतीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील विविध गावांमधून नवनियुक्त ६० शाखाप्रमुख आणि ६० उपशाखाप्रमुख अशा एकूण १२० पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
विक्रमगड येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गाव-पाड्यावर पक्षाची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने सक्षम व कार्यक्षम कार्यकर्त्यांची शाखाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तसेच युवकांना संधी देत उपशाखाप्रमुखपदी नव्या चेहऱ्यांचा समावेश करून स्थानिक पातळीवर मजबूत संघटन उभारण्यावर भर देण्यात आला.
या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियुक्तिपत्र स्वीकारल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करत, पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवून विक्रमगड तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे (ठाकरे गट) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, पालघर जिल्हाप्रमुख ॲड. ओमकार पाटील, जिल्हा संघटिका वैष्णवी व्यापारी, तालुकाप्रमुख प्रमोद पाटील, शहरप्रमुख मनोज खरपडे, उपतालुका प्रमुख मिठाराम भोईर व भास्कर खाल्ले, विधानसभा सहसमन्वयक शंकर रडे, विभागप्रमुख संजय टोकरे, शहर संघटक मनीषा भानुशाली यांच्यासह दिनेश पडवळे, प्रदीप खांजोडे, सौरभ शेलार, जयेश वाजे, संजय किरकिरा, बाळू चौधरी, जानू थोरात, वसंत हडबाळ, हरेश लहांगे, संजय काटकरी आदी मान्यवर, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना विभागप्रमुख तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.