तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या विकासामुळे आर्थिक फायदा

तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या विकासामुळे आर्थिक फायदा
Published on

डहाणूतील पर्यटनस्थळांना नागरिकांची पसंती

कासा, ता. ५ (बातमीदार) : नदी, किल्ले, धरणे, समुद्रकिनारी पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना सध्या नवनवीन ठिकाणी पर्यटन करण्यास आवडते. सध्या अनेक कुटुंबवत्सल नागरिक आपल्या मुलांबाळांसह आठवड्यातून एकदा निसर्गरम्य ठिकाणी फिरावयास जाताना दिसतात. एकदिवसीय सहलीसाठी त्यांचे प्राधान्य असते. त्यामुळे ते आपल्या शहरापासून जवळ असलेल्या पर्यटन ठिकाणाला पसंती देतात. डहाणू तालुक्यातील अशाच अनेक पर्यटनस्थळांना नागरिकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीमबांध, घोळ येथील सासूचे नाक, धामणी, कवडास ही धरणे पाहण्यासाठी सध्या पर्यटक नेहमीच गर्दी करीत असतात.
भीमबांध हे वाघाडी ग्रामपंचायत अंतर्गत सूर्या नदीकिनारी एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. कासा येथून सायवन रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर हे पर्यटनस्थळ आहेत. याबाबतीत ऐतिहासिक दंतकथा अशी की, देवीला प्रसन्न करण्यासाठी व वरदान मिळवण्यासाठी दिवस उगवण्याच्या आत या नदीवर बांध बांधला पाहिजे, असे सांगण्यात आले. सूर्या नदीत भीमाने दगडी बांध बांधला, पण तो रात्रभरात पूर्ण झाला नाही. अशात महालक्ष्मीने कोंबड्याचे रूप घेऊन आरवली घातली. त्या वेळी भीमाला वाटले सकाळ झाली व तो काम सोडून घरी निघून गेला. त्यामुळे तो बांध अर्धवट राहिला. तेथून पाणी वाहत असून, खाली पाण्याचे मोठे खोल डोह आहेत. संपूर्ण काळे मोठे दगड तेथे असून, पर्यटक निसर्गदृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात. सेल्फी काढणे, नदीत पोहणे यासाठी ते येत असतात.

तर सासूचे नाक हे महामार्गावरील जवळघोळ येथे आहे. तिथे सूर्या नदीचे पाणी उंच खडकावरून खाली वाहताना विविध आकार घेते. ते पाहण्यासाठी पर्यतच येथे गर्दी करत असतात. याच परिसरात धामणी धरण व कवडास धरण असून, येथेही पर्यटक येत असतात. तसेच डहाणू तालुक्यात चिंचणी, बोर्डी येथील समुद्रकिनारा, संतोषी माता आशा गडचे मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सप्तशृंगी सारणीचे मंदिर, महालक्ष्मी गड अशी आणखी पर्यटनस्थळ आहेत. सध्या सलगच्या सुट्ट्या व शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे एकदिवसीय सहलीसाठी डहाणुला प्रथम स्थान दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com