सरगम बारवर तीन दिवसांत दोनदा छापा

सरगम बारवर तीन दिवसांत दोनदा छापा
Published on

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : भिवंडीच्या नारपोली परिसरातील ‘सरगम बार अँड रेस्टॉरंट’वर अवघ्या तीन दिवसांत दोनदा पोलिसांनी छापा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या कारवाईनंतरही येथे बेकायदा व अश्लील कृत्ये सुरूच असल्याचे उघड झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नारपोली पोलिस ठाण्याच्या हाकेवर असलेल्या या बारवर १ एप्रिलच्या रात्री पोलिसांनी पहिला छापा टाकला होता. या कारवाईत व्यवस्थापक रामचंद्र पवित्र नाईक, दोन महिला बार डान्सर्स, एक वेटर आणि दोन ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली होती. तसेच ३,२०० रोख रक्कम जप्त केली; मात्र सर्व आरोपींना नोटीस देऊन त्याच दिवशी सोडून देण्यात आले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शुक्रवारी (ता. ३) ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण पथकाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुषार जोशी यांच्या नेतृत्वाखाली रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा छापा टाकला. या वेळी बारचा व्यवस्थापक, मालक सुरेश श्याम शेट्टी, १२ महिला वेटर्स, दोन पुरुष वेटर्स आणि चार ग्राहक अशा एकूण २० जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून ६,६२० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत व्यवस्थापक, मालक, बार डान्सर्स, वेटर्स आणि ग्राहक अशा एकूण २६ जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com