

युद्धजन्य स्थितीमुळे बांधकाम साहित्य दरात वाढ
जव्हार, ता. ५ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात शासनाच्या निरनिराळ्या घरकुल योजनांतर्गत येथील नागरिकांना घर मिळू लागले आहे. मात्र यंदा जागतिक युद्धजन्य स्थितीमुळे बांधकाम साहित्य दरात वाढ झाल्याने येथील नागरिकांचे घरकुल तथा शासकीय प्रकल्प रखडत आहेत.
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम विविध उद्योगांप्रमाणेच बांधकाम क्षेत्रावरही झाला आहे. फरशी, ॲल्युमिनियम व विद्युत साहित्याच्या उत्पादनात घट झाली आहे. फरशी तसेच ॲल्युमिनियमला पावडर कोटिंग करण्यासाठी गॅसची आवश्यकता असते. युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. फरशी उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील अनेक कंपन्या बंद आहेत. परिणामी उपलब्ध फरशीचे दर २५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. ॲल्युमिनियम उद्योगावरही याचा परिणाम झाला आहे. पावडर कोटिंगसाठी गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने उत्पादन घटले आहे.
साहित्य दरवाढीमुळे बांधकाम खर्चात सुमारे ४०० रुपये प्रतिचौरस फूट वाढ झाली आहे. आधीच बुकिंग झालेल्या फ्लॅटच्या दरात वाढ करणे शक्य नसल्याने व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. नवीन बुकिंग मात्र वाढीव दरानेच करावी लागणार आहे. साहित्य दरवाढ आणि अनुपलब्धता यामुळे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. फरशी फूट वाढ झाली आहे. आधीच बुकिंग झालेल्या फ्लॅटच्या दरात वाढ करणे शक्य नसल्याने व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. नवीन बुकिंग मात्र वाढीव दरानेच करावी लागणार आहे. साहित्य दरवाढ आणि अनुपलब्धता यामुळे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. गॅस सिलिंडर पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर फरशी, ॲल्युमिनियम आणि विद्युत साहित्याचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि विद्युत साहित्याचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील घरकुलांसह शासकीय तथा खासगी प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. विविध साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. स्टीलमध्ये सात टक्के, प्लंबिंग साहित्य ३५ टक्के, बाथरूम फिटिंग १५ टक्के, सॅनिटरी वेअर ११ टक्के आणि रंग १८ टक्क्यांनी महागले आहेत.
--------------
आखातातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका बांधकाम व्यवसायाला बसू लागला आहे. बांधकाम साहित्याचे दर सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. बांधकाम खर्चात सुमारे ४०० रुपये प्रतिचौरस फूट इतकी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरू असलेले प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.
----------------
जव्हार तालुक्यात सुरू असलेली बांधकामे ही अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. यास कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती असल्याने बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शिवाय बरेच साहित्य उपलब्धदेखील होत नाही. त्यामुळे हे दर नियंत्रणात येईपर्यंत पुढील बांधकाम करताना वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
- रवींद्र गवते, हातेरी
-----------
यंदा घरकुल बांधताना शासनाकडून दिले जाणारे अनुदान आणि प्रत्यक्षात असलेले बांधकाम साहित्य दर या बाबींचा ताळमेळ बसत नाही. परिणामी तालुक्यातील अनेक घरकुले रखडण्याच्या परिस्थितीत आहे.
- वनिता ठाकरे, वांगणपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.