रिक्षा चालकांच्या मुजोरीतून प्रवाशांची सुटका

रिक्षा चालकांच्या मुजोरीतून प्रवाशांची सुटका
Published on

ठाण्यात मुजोर रिक्षाचालकांना चाप
आरटीओकडून ‘प्री-पेड’ सेवा सज्ज; प्रवाशांची लूट थांबणार
ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून होणारी प्रवाशांची अडवणूक, भाडे नाकारणे आणि आर्थिक लुबाडणुकीला आता पूर्णविराम मिळणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने ठाणे स्थानक (पश्चिम) परिसरात ‘प्री-पेड रिक्षा’ सेवेला हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच या सेवेचे अधिकृत उद्‍घाटन होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होणार आहे.

ठाणे स्थानकावरून दररोज सुमारे आठ ते नऊ लाख प्रवासी ये-जा करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून प्री-पेड सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी स्थानकाबाहेरील विशेष केबिनमध्ये आगाऊ बुकिंग करता येईल. अंतराप्रमाणे ठराविक भाडे आकारले जाणार असल्याने जादा पैसे उकळणाऱ्या चालकांना लगाम बसेल. जवळचे भाडे नाकारणाऱ्या मुजोर चालकांच्या मनमानीला या सेवेमुळे चाप बसेल.

प्रवाशांच्या तक्रारींची दखल
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून केवळ लांबचे भाडे घेणे, बेशिस्त पार्किंग आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन करण्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीओने ही कठोर पावले उचलली आहेत. या सेवेमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांनाही न्याय मिळेल आणि त्यांना भाड्यासाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आरटीओकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून ‘ट्रायल रन’देखील यशस्वी झाला आहे. या सेवेमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांना शिस्त लागेल आणि प्रवाशांना बुकिंग करताच तत्काळ रिक्षा उपलब्ध होईल.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.

प्रवाशांना आता जवळच्या ठिकाणीही विनासायास जाता येईल. लांबच्या भाड्याच्या नावाखाली होणारी आर्थिक फसवणूक या सुविधेमुळे कायमची बंद होईल.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com