वसईच्या कुमारी लॅरिसा आल्मेडाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

वसईच्या  कुमारी लॅरिसा आल्मेडाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
Published on

वसईच्या लॅरिसा आल्मेडाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
विरार, ता. ५ (बातमीदार) ः वसईची गायिका कुमारी लॅरिसा आल्मेडा हिने संगीत क्षेत्रात आपल्या कौशल्याने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स २०२६ (मिमा) सोहळ्यात लॅरिसाला सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र आर्ट्स ॲण्ड कल्चर फाउंडेशन यांच्या वतीने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहातहा सोहळा पार पडला.
या स्पर्धेत एकूण पाच नामांकनांमधून लॅरिसाने ‘पाऊस सुखाचा आला’ या गाण्यासाठी मराठी भावगीत पॉप-सर्वोत्कृष्ट गायिका हा मानाचा पुरस्कार पटकावला. तिच्या आवाजातील अभिव्यक्ती आणि सुरेल सादरीकरण यामुळे तिला हा बहुमान मिळाला. या सोहळ्याला संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अजित कडकडे, नंदेश उमप, गीतकार गुरु ठाकूर, गायिका बेला शेंडे, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अविनाश- विश्वजीत, कौशल इनामदार, सावनी रवींद्र आणि अजय-अतुल यासारख्या व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान, हे सर्व श्रेय माझे आई-वडील, गुरु व श्रोत्यांचे आहे. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले, अशी प्रतिक्रिया लॅरिसा आल्मेडा हिने दिली. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com