

ठाणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत
जिल्हा परिषदेचा पालकांना सावधगिरीचा इशारा
ठाणे, ता. ५ : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात शासनमान्यता नसतानाही अनेक संस्थांनी अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले असून, अशा २७ शाळांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. आकर्षक जाहिरातींना बळी न पडता केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच पाल्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
अनेक अनधिकृत शाळा सीबीएसई, आयसीएसई, आयबी किंवा राज्य मंडळाच्या नावाखाली मोठ्या जाहिराती करतात. प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर मान्यता नसते. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार, विनामान्यता शाळा चालवणे हा गुन्हा आहे. अशा शाळांविरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे.
अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेतल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही. प्रवेश घेण्यापूर्वी शाळा शासनमान्य असल्याची खात्री करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पालकांची फसवणूक
पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेताना संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनधिकृत शाळांकडून आकर्षक जाहिराती करून पालकांची फसवणूक केली जात आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.
अनधिकृत शाळांची यादी
१. अंबरनाथ तालुका (पंचायत समिती)
अनिरुद्ध हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कुळगाव, बदलापूर.
श्री. चैतन्य टेक्नो स्कूल, कुळगाव, बदलापूर.
नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, वांगणी (पश्चिम).
श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर (प्राथमिक), अडिवली भाल.
२. भिवंडी तालुका (पंचायत समिती)
लिओ हायस्कूल, काल्हेर.
नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे.
श्री. चैतन्य टेक्नो स्कूल, सोनाळे.
पाठशाळा कोचिंग क्लास, मीठपाडा.
अग्नीमाता इंग्लिश स्कूल, पिंपळास.
मिन्हाज नॅशनल इंग्लिश स्कूल, गोरसई.
सुग्रा बीबी स्कूल, तळवली.
द विनर्स इंग्लिश स्कूल, कांबे.
३. कल्याण तालुका (पंचायत समिती)
जी. के. इंग्रजी हायस्कूल, खडवली.
चैतन्य टेक्नो स्कूल, अनंतम रिजन्सी, डोंबिवली (पूर्व).
कमांडर प्रकाश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खडवली (पूर्व).
कायधान इंग्लिश स्कूल.
एपीएच स्कूल, खोणी.
सिम्बायोसिस स्कूल, कोंढेरी.
एसआरडीपी स्कूल, निबंवली.
संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल, निंबवली.
सेव्हन स्ट्रीम स्कूल, पिसवली.
ओमकार इंग्लिश स्कूल, पिसवली.
४. शहापूर तालुका (पंचायत समिती)
श्री. शारदा इंग्लिश स्कूल, शेरे.
न्यू इंग्लिश स्कूल (सीबीएसई) / माऊंड कार्नल स्कूल, तांबडमाळ.
एम. जे. वर्ल्ड स्कूल (सीबीएसई), तांबडमाळ.
एम. आर. प्राथमिक विद्यालय, आसनगाव.
सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल, गोठेघर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.