

तेल सांडल्याने वाहतूक मंदावली
ठाणे : साकेत ब्रिजजवळ रविवारी (ता. ५) सकाळी ८.३०च्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर माती टाकली. वेळेत केलेल्या या उपाययोजनेमुळे संभाव्य मोठे अपघात टळले. काही काळ वाहतूक मंदावली होती; मात्र माती टाकल्यानंतर रस्ता सुरक्षित करून वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला.
..............
लोकल प्रवासात लॅपटॉप लंपास
ठाणे : मध्य रेल्वेवर लोकल प्रवासादरम्यान समीर जाधव (३१) या तरुणाची लॅपटॉप बॅग चोरीला गेल्याची घटना घडली. ३० मार्चला रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून ७५,७५६ रुपये किमतीचा लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.