

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) ः पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करीत हत्या केली. ही घटना तालुक्यातील टेंभिवली या गावातील वीटभट्टीवर शनिवारी घडली.
तालुक्यातील टेंभिवली गावातील वीटभट्टीवर मजूर म्हणून सुरेश वाघे व इंदिरा वाघे हे पतिपत्नी काम करीत होते. इतर व्यक्तीसोबत शारीरिक संबंध असल्याच्या संशयाने पती सुरेश हा पत्नी इंदिरा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यात दारूच्या व्यसानामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यात सुरेशने अवजड वस्तू डोक्यात मारून पत्नी इंदिरा हिची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच इतरांनी सुरेशला पकडून ठेवत घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिस ठाण्याला दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात पाठवला. तसेच सुरेशला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.