पर्यावरण नष्ट करणारे टोरेंट,पोशीर,शिलार प्रकल्प हटवा

पर्यावरण नष्ट करणारे टोरेंट,पोशीर,शिलार प्रकल्प हटवा
Published on

कर्जतमध्ये प्रकल्पांविरोधात एल्गार
पर्यावरणप्रेमींचा आंदोलन व कायदेशीर लढ्याचा इशारा
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः प्रस्तावित धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांविरोधात कर्जतचे पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थ एकवटले आहेत. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याचा दावा करत पर्यावरणप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला. कर्जत शहरातील शनी मंदिर सभागृहात रविवारी (ता. ५) झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
कैलास मोरे म्हणाले की, या प्रकल्पांमुळे हजारो झाडांची कत्तल होऊन सह्याद्रीतील जैवविविधता धोक्यात येणार आहे. कर्जतचे ग्रीन झोन, फार्महाउस व पर्यटन व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम होईल. स्थानिकांना कोणताही फायदा न होता बाहेरील शहरांसाठी पाणी व वीज वळवली जात आहे. त्यामुळे स्थानिकांचा बळी, बाहेरच्यांचा फायदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रवीण गांगल यांनी कोयना परिसरातील भूकंपांचा संदर्भ देत कर्जत तालुक्याभोवती मोठ्या प्रमाणात धरणे उभारल्यास भूकंपाचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली. भाऊ खानविलकर यांनी प्रशासनावर टीका करत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगितले. जगदीश ठाकरे यांनी धरणातील पाण्याचा स्थानिकांसाठी साठा राखण्याची गरज व्यक्त केली.

उद्धव ठाकरे आणि सयाजी शिंदे यांचा पाठिंबा
बाबू घारे यांनी लवकरच मोठे जनआंदोलन उभे राहील, या आंदोलनात ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा सहभागी होणार आहेत, असे सांगितले. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पर्यावरण संवर्धन टीमनेही या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली असल्याचे या वेळी मोरे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com