

अंबरनाथ (वार्ताहर) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या हल्ल्यात राजकुमार सरोज (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात शनिवारी (ता.४) पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास हनुमान मंदिराजवळ घडली. राजकुमार हा राहत्या गाळ्याबाहेर आला असता, तेथे उपस्थित असलेल्या शुभम देशमुख आणि दीपेश मानकर यांनी दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, राजकुमारने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोघांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. दरम्यान, शुभमने जवळील चाकू काढून राजकुमारवर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.