

मुंबई, ता. ५ : एका खासगी जहाज कंपनीतील जहाजप्रमुखाच्या मुलीला तत्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आणि त्यांनी दाखल केलेले अपील फेटाळून लावले.
जहाजप्रमुख २०१२मध्ये रजेवर असताना त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. याप्रकरणी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे मिळणारा नुकसानभरपाईचा दावा टाळण्यासाठी शक्य ते सर्व अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे निरीक्षण न्या. एस. एम मोडक आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने नोंदवले आणि टीके शिपिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआयपीएल) या कंपनीला दिवंगत कॅप्टन बलदेव सिंग धिन्सा यांच्या मुलीला, त्यांच्या सेवा करारानुसार आठ आठवड्यांत २,४६,७८० डॉलर्स (सुमारे २.२८ कोटी रुपये) इतकी रक्कम देण्याचे आदेश दिले. प्रथम अपील प्राधिकरणाने (एफएए) जुलै २०१७मध्ये कंपनीला ४४ वर्षीय अंबिका धिन्सा यांना त्यांच्या वडिलांच्या सेवा करारातील अटींनुसार मृत्यूमुळे मिळणारी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान
दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.