डीपीएस तलाव स्वच्छतेला वेग

डीपीएस तलाव स्वच्छतेला वेग
Published on

डीपीएस तलाव स्वच्छतेला वेग
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलाव स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने ‘ऑपरेशन डीपीएस फ्लेमिंगो लेक क्लीनअप’ हाती घेतले असून, आतापर्यंत सुमारे २.५ टन शेवाळयुक्त गाळ काढण्यात आला आहे. वाढत्या पर्यावरणीय समस्यांवर दिलेला हा पहिला ठोस प्रतिसाद मानला जात आहे. वन विभागाच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने दररोज ५०० ते ६०० किलो शेवाळ काढण्याचे काम सुरू आहे.
तलावात साचलेल्या शेवाळामुळे फ्लेमिंगोंच्या अधिवासावर परिणाम झाला होता. पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले असले तरी, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असल्याचे मत व्यक्त केले आहे. नेट कनेक्ट फाउंडेशनने तलावाच्या रचनेतील त्रुटींवर लक्ष वेधत भरती-ओहोटीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ही मुख्य समस्या असल्याचे सांगितले.
तलावातील पाण्याच्या चाचण्यांमध्ये टीडीएस, पीएच, बीओडी व सीओडीचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. यामुळे यंदा फ्लेमिंगोंचे आगमन झाले नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तलावाचे पूर्वीचे ‘पिंक ब्यूटी’ स्वरूप परत मिळवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना व सातत्यपूर्ण देखरेखीची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com