

एमआयडीसीत संशयास्पद कचरा साठा
ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष
बोईसर, ता. ५ (वार्ताहर) : बोईसर परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत मान हद्दीत औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात साठवलेला आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी प्लॅस्टिक स्वरूपातील कचरा तसेच औषधसदृश सामग्री दिसून येत असल्याची माहिती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे, काही औद्योगिक युनिट्समधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा साठाही या परिसरात असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय परिणाम आणि सार्वजनिक आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, परिस्थितीची सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या विषयावर संबंधित विभागांकडे विचारणा केली असता, अधिकार क्षेत्राबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र दिसून येते. काही स्तरांवर हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले जात असले, तरी समन्वयाची गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत ग्रामसभेची भूमिका महत्त्वाची मानली जात असल्याने, या प्रकरणात ग्रामपंचायत ग्रामसभेत कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी योग्य ती दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.