

प्रभाग ‘जी’मधील विविध विकासकामांना मंजुरी
विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचा २०२६-२७ वर्षाचा नवीन अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला असून, वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. बविआचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका हे लगेच कामाला लागले असून, त्यांनी आपापल्या प्रभागातील विकासकामे युद्धपातळीवर मार्गी लावण्याबाबत महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती तसेच संबंधित पदाधिकारी यांच्याकडे मागणी पाठपुरावा व भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे.
सदर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश लाभलेले असून, प्रभाग समिती ‘जी’मधील खालील एकूण ३४ कोटी ३८ लाख ६६ हजार ४९० रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया पार पाडणे, कार्यादेश देणे इत्यादी विविध प्रक्रिया पार पाडून टप्प्याटप्प्याने विकासकामे करण्यास ३० मार्च रोजीच्या महासभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सदर विकासकामांमध्ये गटार, निवारा केंद्र, आरोग्य केंद्र अशा विकासकामांचा समावेश आहे. ही विकासकामे पूर्ण होईपर्यंत या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे मत नगरसेवक कन्हैया भोईर व सुनील आचोळकर तसेच नगरसेविका दीपा पाटील व ज्योत्स्ना भगली यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.