बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ३० लाखांचा गंडा

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ३० लाखांचा गंडा
Published on

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : लक्झरी कार खरेदीच्या नावाखाली बनावट कागदपत्रांचा वापर करून खारघर येथील ‘दि डेक्कन मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक’ची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरखैरणे येथील रहिवासी नामदेव शंकर चिकणे याने कार खरेदीसाठी ३९ लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. कर्जासाठी त्याने मुलगा, मुलगी आणि जावई यांना जामीनदार म्हणून उभे केले होते. बँकेने कागदपत्रांची पडताळणी करून ३० लाख रुपयांचे वाहन कर्ज मंजूर करत १५ एप्रिल २०२४ मध्ये रक्कम वितरित केली. मात्र, कर्ज मिळाल्यानंतर आरोपीने वाहन दाखवण्यास टाळाटाळ केली. बँकेने पाठपुरावा केल्यानंतर त्याने कार न दाखवता बनावट नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि बनावट चावी बँकेत सादर केली. यामुळे संशय आल्याने बँकेने कागदपत्रांची तपासणी केली असता सादर केलेले कोटेशन आणि आरसी बुक बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जमा केलेली चावीही खोटी असल्याचे आढळून आले.
तपासात पुढे असेही निष्पन्न झाले की, कर्जाची रक्कम ज्या खात्यावर जमा केल्याचे दाखवण्यात आले होते ते शोरूमचे नसून जय शंकर पांडे या व्यक्तीचे खाते होते. तसेच ही रक्कम आरोपीने आपल्या मुलगा पंडीतराव चिकणे यांच्या विविध खात्यांमध्ये वळवून वैयक्तिक वापरासाठी वापरल्याचे उघड झाले. याप्रकरणी बँकेचे वसुली अधिकारी तुशार दिवेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी नामदेव चिकणे (मुख्य आरोपी), पंडीतराव चिकणे (मुलगा), दिशा लिमन (मुलगी), अविनाश लिमन (जावई) आणि जय शंकर पांडे (सहभागीदार) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com