

रोजगार हमीतून विकास साधा!
वाणगाव (बातमीदार): रोजगार हमी योजना कुटुंबाचा सर्वांगीण विकास साध्य करणारी योजना आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयांमध्ये कृषीचे उत्तम ज्ञान घेऊन शेतीतच नव्हे तर गावपाड्यातील इतर शेतकऱ्यापर्यंत पोचवून योजनेच्या माध्यमातून विकास साधावा, असे प्रतिपादन पालघर उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव यांनी केले. तसेच आसनगावच्या कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर तब्बल पाच एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर सेंद्रिय खतावर शेती फुलवली आहे, कृषीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच व्यवसायभिमुख शेतीचे तंत्रज्ञान लाभत असल्याने भविष्यात विषमुक्त अन्नासाठी प्रयत्न केले जात असल्याने विद्यार्थ्यांसह कृषी प्रतिष्ठानचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.