

एका दिवसात १४ जणांना दंश
कासा परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव
कासा, ता. ६ (बातमीदार) ः कासा उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसात १४ जणांना श्वानदंशामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर दीड महिन्यात ५० हून अधिक नागरिकांवर उपचार झाले आहेत.
डहाणू तालुक्यातील कासा परिसरात मोकाट श्नानांचा उपद्रव वाढत आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात रेबीजवर उपचारांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे तलासरी, डहाणू तसेच इतर दुर्गम भागातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. मात्र, परिसरात मोकाट श्वानांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी भराड गावात एका पिसाळलेल्या श्वानाने दोन लहान मुलांसह एका १५ वर्षीय मुलीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. तसेच काही पाळीव श्वानांना चावा घेतल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन लसीकरण केले, पण पिसाळलेला श्नान सापडला नसल्याने भीतीचे वातावरण आहे.
------------------------------------
मुबलक अन्न
गेल्या महिन्यात पशुसंवर्धन विभागाने डहाणू, तलासरी व इतर भागात रेबीज लसीकरण मोहीम राबवली होती. तरीही कासा, चारोटी ग्रामपंचायत हद्दीत मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठ परिसरात चिकन, मटण, मच्छीविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
--------------------
डहाणू, तलासरी, कोसबाड, आशागड भागात रेबीज लसीकरण मोहीम राबवली आहे. कासात लसीकरण, निर्बीजीकरण मोहीम राबवण्यास तयार आहोत. मात्र, ग्रामपंचायतीचे सहकार्य आवश्यक आहे.
- डॉ. सिद्धार्थ साबळे, पशुवैद्यकीय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.