कल्याणमध्ये भाजपची प्रशिक्षण कार्यशाळा

कल्याणमध्ये भाजपची प्रशिक्षण कार्यशाळा
Published on

संघटना बळकटीकरणाचा ‘मंत्र’
कल्याणमध्ये भाजपची प्रशिक्षण कार्यशाळा; पंडित दीनदयाल उपाध्याय अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात राबविण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत कल्याणमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. ५) कल्याण पश्चिमेकडील बालक मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेत भाजपच्या जुने कल्याण मंडळ आणि मध्य कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले. यात पक्षवाढीसाठी तळागाळापर्यंत कसे पोहोचावे. सक्षम नेतृत्व विकसित करण्याच्या पद्धती, भाजपची मूळ तत्त्वे आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला. तळागाळात संघटना अधिक मजबूत करणे आणि जनसंपर्क वाढवणे हेच या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या वेळी वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी राजकीय व सामाजिक कृती योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सभागृह नेते वरुण पाटील, नगरसेवक अमित धात्रक, मंडळ अध्यक्ष रितेश फडके यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह
प्रशिक्षणादरम्यान मिळालेली माहिती आणि मार्गदर्शन आगामी निवडणुकांच्या व संघटनात्मक कामाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संघटनेला अधिक सक्रिय करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com